vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

पुणे प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाचा शुभारंभ झाला. यावेळी सहायक संचालक (वित्त व लेखा) अनिल गिते , सहायक आयुक्त विशाल लोंढे, माधुरी वाघमोडे, ज्ञानेश्वर जावळे, समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सप्ताहाची माहिती देण्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समता, महापुरुषांचे विचार आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या सप्ताहाच्या नियोजनाबाबत पुणे व‍िभागातील जिल्हा स्तरावर शहरी व ग्रामिण भागात सहाय्यक आयुक्त समाज कल्‍याण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्‍हापूर या कार्यालयाने आपापल्या कार्यक्षेत्रात जय्यत तयारी केली असून, या सात दिवसांत खालीलप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ९ एप्रिल रोजी युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि आंबेडकरी विचार या विषयांवर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १० एप्रिल रोजी योजना प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत समता दूतांमार्फत पथनाट्ये व लघुनाटिका सादर करून शासकीय योजनांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विविध गौरवपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी संविधान जागर व महिला मेळाव्याअंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने आयोजित केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष महिला मेळावा घेण्यात येणार आहे.

दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियानाद्वारे सामाजिक सेवेचे व्रत जोपासले जाईल. तसेच कोल्‍हापूर औद्योगिक संस्‍था मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजि‍त केली जाईल.

दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी केली जाणार असून व्याख्याने आणि चर्चासत्रांनंतर या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप होणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी-जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत कातळशिल्पांचा समावेशासाठी रोडमॅप तयार करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-