vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी रविवार, 28 जून 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी राज्यभरात 89,489 लसीकरण बुथ, 26,530 ट्रान्झिट पथके, 13,518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत.

देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर 2010 मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने देशात या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कायम असून सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात रविवार, 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील अंदाजे 1 कोटी 3 लाख बालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ व्हॅक्सीन (bOPV) चे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.

बुथवर येऊ न शकलेल्या बालकांचे शहरी भागात पुढील पाच दिवस आणि ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गृहभेटीद्वारे लसीकरण करण्यात येईल. तसेच प्रवासात असलेल्या बालकांसाठी ट्रान्झिट, मोबाईल आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फतही मोहिमेच्या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य लसीकरण कृती दलाची बैठक घेण्यात आली असून सर्व संबंधित शासकीय विभाग आणि विविध यंत्रणांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या समन्वयासाठी प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेसाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा, तालुका आणि वॉर्ड स्तरावरही नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर वैद्यकीय अधिकारी तसेच लसीकरण कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व शहर लसीकरण कृती दलाच्या बैठका घेण्यात आल्या असून मोहिमेसाठी आवश्यक निधी, वित्तीय मार्गदर्शक सूचना आणि पोलिओ लसीचा पुरेसा साठाही सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

विशेष लेख :-मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !

vishwatmaklokswamivarta

📢 *आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास शिक्षण विभागाकडे करा तक्रार* शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची माहिती

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उद्योग पुरस्कार वितरण सोहळा-औद्योगिक विकासाला चालना;सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस