vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

 

गडचिरोली, प्रतिनिधी : भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधाण्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर डोंगरे यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025” उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज गडचिरोली पाटबंधारे विभागात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिक्षक प्रीती हिरळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सविता सादमवार, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट व राहुल गुळघाने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना प्रीती हिरळकर यांनी जलसंवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तर डॉ. सादमवार यांनी जलजागृतीसाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. पाणी हा फक्त निसर्गसंपत्तीचा भाग नसून तो संस्कृतीचा आणि समाजाच्या आरोग्याचा आधार असल्याच्या त्या म्हणाल्या

कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी जलसंकट टाळण्यासाठी युवकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी जलप्रदूषण टाळणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले. जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 दरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक भांडेकर तर आभार प्रदर्शन कमलेश आखाडे यांनी केले.कार्यक्रमाला सहायक अभियंता अमित डोंगरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

#DioGadchiroli #GadchiroliUpdates

संबंधित पोस्ट

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

vishwatmaklokswamivarta

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरु, गृहमंत्री अमित शाह यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती, ९ मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta