vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पिंपळवंडी बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पिंपळवंडी बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई प्रतिनिधी-

पिंपळवंडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.फास्ट ट्रॅक कोर्टासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार

    या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, “हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.”

पीडित कुटुंबाची लवकरच घेणार भेट    पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्या लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार

दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन