vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

          नवी मुंबई प्रतिनिधी  उपजिविकेसाठी देहविक्रय करणा-या महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विशेष कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांना वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमता प्राप्त करुन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाला सुरुवातीपासूनच लाभलेला चांगला प्रतिसाद बघता हा हेतू साध्य झाल्याचे दिसून येत आहे.

या उपक्रमांतर्गत महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, डिजीटल साक्षरता तसेच उपजिविकेची पर्यायी साधने याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यास अनुसरून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेमार्फत तुर्भे विभागातील देहविक्रय करणा-या महिलांना मेहंदी ब्युटिशिअन व शिवणकाम याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सदर प्रशिक्षणाकरिता क्षमता या स्वयंसेवी संस्थेचा सहयोग लाभला असून त्यांच्यामार्फत प्रशिक्षणासाठी तेथील जागा उपलब्धता व या महिलांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. सध्या यामध्ये 61 महिला सहभागी झाल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागामार्फत महिला विकासांतर्गत हे प्रशिक्षण देहविक्रय करणा-या महिलांसाठी एक नवा व प्रगतीशील असा महत्वपूर्ण टप्पा ठरणार असून या महिलांच्या जीवनात याव्दारे नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

000000

संबंधित पोस्ट

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,बांद्रा रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या झोपड्यांवर बेकायदेशीर बांधकामावर रेल्वे प्रशासनाचा बुलडोजर मोहीम सुरू

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिलासा-मुख्यमंत्री सहायता योजना व आरोग्य विभागाचा पुढाकार – फार्मसी विद्यार्थ्यांची सेवाभावाने सहभाग

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील