देशभरातील २० एनसीसी महिला कॅडेट्सनी ३० दिवसांची ‘अपराजिता – परांग ला २०२६’ ही उंचावरील गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पूर्ण …
नवी दिल्ली प्रतिनिधी
देशभरातील २० एनसीसी महिला कॅडेट्सनी ३० दिवसांची ‘अपराजिता – परांग ला २०२६’ ही उंचावरील गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
हिमाचल प्रदेशातील किब्बरपासून लडाखमधील कारझोकपर्यंत कॅडेट्सनी सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास केला. या मोहिमेदरम्यान त्यांनी ५ हजार ५७८ मीटर उंचीवरील परांग ला खिंड पार केली.
तरुणींमध्ये साहस, नेतृत्वगुण, सांघिक भावना आणि चिकाटी वाढवणं, तसंच राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक मजबूत करणं, हा या मोहिमेचा उद्देश होता.