vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिलासा-मुख्यमंत्री सहायता योजना व आरोग्य विभागाचा पुढाकार – फार्मसी विद्यार्थ्यांची सेवाभावाने सहभाग

फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिलासा-मुख्यमंत्री सहायता योजना व आरोग्य विभागाचा पुढाकार – फार्मसी विद्यार्थ्यांची सेवाभावाने सहभाग

सातारा प्रतिनिधी  :- श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे मुख्यमंत्री सहायता योजनेतून तसेच आरोग्य विभागाच्या वतीने “चरण सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.पालखी सोहळ्यात दीर्घ पल्ल्याचा पायी प्रवास करताना वारकऱ्यांना पायांमध्ये वेदना, सूज व थकवा जाणवतो. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ही अभिनव संकल्पना राबवत वारकऱ्यांना पायांची मालिश (मसाज) करून दिलासा देण्याचे काम केले.

फलटण येथील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांचे पाय स्वच्छ करून त्यांना औषधी तेलाने मसाज करून सेवा केली. या सेवेमुळे वारकऱ्यांना मोठा आराम मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.

वारकरी संप्रदायातील सेवा आणि भक्ती यांचे अनोखे दर्शन या उपक्रमातून घडले. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी केलेल्या या सेवाकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान-मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.

पापड, लोणचे, मसाला पावडर बनवण्याचेमोफत प्रशिक्षण मिरज येथे संपन्न