vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा43 बंद्यांचा सहभाग

बुलढाणा, प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे बंद्यांमध्ये गांधी विचारांची रुजवणूक करून त्यांना जबाबदार नागरिक बनविण्याच्या उद्देशाने गांधी शांती परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेचे आयोजन मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई तसेच बुलडाणा जिल्हा सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या परीक्षेमध्ये एकूण 43 बंद्यांनी सहभाग घेतला. परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या बंद्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले, तर इतर सहभागी बंद्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षा लता ओंकार राजपुत उपस्थित होत्या. यावेळी सर्वोदय मंडळ कार्यकर्ते रमेश वानखेडे व नभिजितसिंह ओंकारसिंह राजपुत यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कारागृह अधीक्षक मेघा कदम-बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक, सुभेदार दरेसिंग चव्हाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कारागृह शिपाई वैभव राणे, दिनेश डोंगरदिवे, उमेश बोंद्रे, जितेश काळवाघे, चंद्रकांत महाले व अश्विनी भालके यांचे विशेष सहकार्य लाभले

संबंधित पोस्ट

मध्यपूर्व देशांत अडकलेले नांदेडचे ५९ नागरिक सुरक्षित**अडकलेल्या नागरिकांनी ‘नवीन सहाय्यता गल्फ’ लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन*

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,एल-निनो प्रभाव व उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न