vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

 

रायगड प्रतिनिधी न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.राजंदेकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विधीज्ञ ॲड. श्रीराम ठोसर यांनी “न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर” या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर होते, तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश क. 2 एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश भगत, विधीज्ञ ॲड. श्रीराम ठोसर आणि रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश ए. एस. राजंदेकर म्हणाले, “मराठी भाषा समृद्ध असून उच्चारांवर वाक्याचा अर्थ बदलतो. मात्र, तिचा योग्य वापर होत नाही, ही खंत आहे. न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

व्याख्यानात ॲड. श्रीराम ठोसर यांनी मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजात महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “इतर भाषा शिकताना आपण मराठीकडे दुर्लक्ष करतो, हे चिंताजनक आहे. मराठी भाषा जोपासणे व संवर्धन करणे गरजेचे आहे. सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी न्यायालयात अधिकाधिक मराठीचा वापर करावा. न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर वाढावा आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे यांनी केले.

 

000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..