vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

विशिष्ट बियाणे व रासायनिक खताचा आग्रह धरु नये; कृषि विभागाचे आवाहन

विशिष्ट बियाणे व रासायनिक खताचा आग्रह धरु नये; कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : शेतकरी खरीप हगांमाच्या लगबगीला लागला असून, शेत मशागती, खते व बियाणे खरेदी करणे सुरु झाली आहे. कपाशी व सोयाबीन जिल्ह्यातील मुख्य पिके असून जिल्ह्यातील काही भागात विशिष्ट कापुस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत असल्याचे दिसुन येत आहे. तरी सर्व शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येते की, बियाण्यामध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे असुन भरपुर उत्पन्न देणारे आहेत. त्यामुळे विशिष्ट बियाणे किंवा रासायनिक खताचा आग्रह करुन नये.

सोयाबीन पिकात स्वपरागीकरण होत असल्याने शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याची दरवर्षी बाजारातून नवीन वाण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा खरेदी केलेल्या बियाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यास बियाणे तीन वर्षापर्यत वापरल्यास बियाण्यावरील खर्च कमी होईल. तरी सुध्दा बुलडाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये शेतकरी विशिष्ट कापुस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत आहे. कपाशीतील सर्व वाणाचे बिटी जैव तंत्रज्ञान एकच असुन सर्वाची उत्पादन क्षमता जवळपास सारखीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी एकाच वाणाचा आग्रह धरण्यात येऊ नये. पिकाचे उत्पन्न हे जमिनीचा पोत, पाऊसमान, योग्य वेळी केलेली शेती मशागत यावर अवलंबुन आहे. पिकाच्या योग्य वेळेत झालेला पाऊस, जमिनीचा उत्तम पोत व वेळी व केलेल्या मशागतीमुळे भरगोस उत्पन्न मिळते.

घरच्या सोयाबीन बियाण्याची योग्य चाळणी व बिज प्रक्रीया करून घरच्या घरी उगवणशक्ती तपासुन 100 मिली पाऊस पडल्यानंतर 2 ते 3 सेमी खोलीत बियाण्याची पेरणी केल्यास पिक उगवणीबाबत तक्रार राहणार नाही. कुठलेही बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. लेबल वरील लॉट नंबर व बिलातील लॉट नंबर पडताळुन पाहावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशी पिकाची लागवड 1 जुन नंतरच करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत सागरी व ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा**एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta