vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

बुलढाणा, प्रतिनिधी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली येथे आज दि. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला आमदार श्वेताताई महाले पाटील, अंकुशराव पाटील, आयएमसीचे उपाध्यक्ष अजित कोठारी, कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. केदार ठोसर, प्रा. प्रशांत देशमुख, आयएमसी सदस्य मनोज सोनूने, भिकाजी पाटील, प्रशांतजी बोधेकर, मिलिंद हिवाळे, अमोल गवले, प्राचार्य श्री.बेदरकर, सागर पुरोहित यांची उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते यांनी डॉ. केदार ठोसर यांनी पर्यावरण संरक्षण तर प्रशांत देशमुख यांनी सामाजिक समरसता या विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य बेदरकर यांनी केली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारंपरिक खेळ, पारंपरिक वेशभूषा यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश घुगे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य तथा सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

0000

संबंधित पोस्ट

अमृत’ संस्था देतेय प्रशिक्षण; व्याज परतावा योजनेचाही लाभ….

vishwatmaklokswamivarta

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी