vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

. राज्य प्रतिनिधी- गडचिरोली येथील मौजा कोठी येथील आठवडी बाजारादरम्यान तज्ञ वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची तपासणी   या अभिनव उपक्रमादरम्यान पोस्टे कोठी व उपपोस्टे व्यंकटापूर हद्दीतील एकूण 207 नागरिकांची तपासणी केली.

पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली, सीआरपीएफ व शालीनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रममौजा कोठी येथील आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृत

मौजा कोठी येथील मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 107 नागरिकांची व उपपोस्टे व्यंकटापूर हद्दीतील सुमारे 100 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 36 नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच बालरोग तज्ञांकडून शालेय विद्याथ्र्यांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. #freemedicalcheckup #gadchiroli #gadchirolipolice

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 389 अर्ज प्राप्त

vishwatmaklokswamivarta