vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पालघरमध्ये भीषण दुर्घटना प्रक्रिया मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

पालघरमध्ये भीषण दुर्घटना प्रक्रिया मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

मुंबई प्रतिनिधी -पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर पुलाखालून जात असताना भरधाव वेगाने असलेल्या एका हायवा ट्रकने पुलाच्या बांधकामाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हायवा ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच गेल्या केवळ दोन महिन्यांत या परिसरात घडलेला हा चौथा अपघात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महामार्गाचे काम सुरू असताना अवजड वाहनांच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

मुंबईकरांसाठी बातमी रविवारी नाही तर आज रात्री असणार मेगा ब्लॉक, NEET विद्यार्थ्यांना दिलासा

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पालघर जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर