vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

 

प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे): ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फडतरे यांनी जिल्हा परिषद सातारा येथे काम करत असताना कोविड काळात उत्कृष्ट कामकाज केले आहे. ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

    या पुरस्कारामार्फत त्यांचे सकारात्मक प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख कामगिरी यांची शासन स्तरावरून दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रामाणिकता, काटेकोर नियोजन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.

     हा गौरव कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. अविनाश फडतरे यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेतील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

000000000–

संबंधित पोस्ट

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

vishwatmaklokswamivarta

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवा अशा विविध बाबींचा**आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून सविस्तर आढावा*