vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर विधानसभा प्रश्नोत्तर

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर-विधानसभा प्रश्नोत्तर..

मुंबई, : प्रतिनिधी –

महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अंतर्गत, तसेच इतर कामगार कायद्यातील तरतुदीनुसार सुरक्षा रक्षकांना असणारे सर्व लाभ या आस्थापनांनी अदा करणे बंधनकारक आहे. मात्र सुरक्षा मंडळात नोंदीत नसलेल्या आस्थापना खासगी सुरक्षा रक्षकांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत जिल्हानिहाय तपासणी मोहीम राबविण्यात येईल, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

खासगी सुरक्षा रक्षकांच्या हक्काबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये किशोर जोरगेवार, महेश शिंदे, प्रशांत बंब, सुलभा गायकवाड यांनी सहभाग घेतला.या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, कामगार विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. लवकरच विभागात भरती करण्यात येणार आहे. कामगार कायद्याअंतर्गत आस्थापनांची नोंदणी करण्यात येते. सुरक्षा मंडळांकडे नोंदीत आस्थापना आहेत. मात्र गृहनिर्माण संस्था सुरक्षा मंडळाकडे नोंदीत नाहीत. त्यामुळे अशा संस्थांकडे खासगी सुरक्षा रक्षकांच्या हक्काबाबत तातडीने तपासणी करण्यात येईल.

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन 

धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा**एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभविद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळअधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर

भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव”- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा

vishwatmaklokswamivarta

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी