vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी मुंबई प्रतिनिधी-गणेशमूर्ती मोठी असण्यापेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सवासारखा श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ चे आयोजन सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे करण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

मूर्ती मोठी असो वा लहान, भक्ती तेवढीच असते. ईश्वराचा आशीर्वाद मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण समाजाची आणि पर्यावरणाची किती सेवा करतो यावर अवलंबून असतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सवय पुढील पिढीपासूनच रुजविण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या अभिनव कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यशाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तींचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी स्वतःही गणेशमूर्ती साकारली. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आपल्यासोबत बाप्पाची मूर्ती घडवत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मंत्री पंकजा मुंडे यांनीही स्वतः गणेशमूर्ती साकारत सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.

संबंधित पोस्ट

शासकीय अधिकाऱ्यांशी परस्पर समन्वयानेसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे-गतिमानता अभियानता उत्कृष्ट अधिकारी उपक्रमांतर्गत पुरस्कार वितरण उत्साहात..

वांद्र स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित…

आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक कार्यवाही

मुंबई  पोलीस उपायुक्त परिमंडळ ​​4, मुंबई पोलिसांनी 3 बांगलादेशी नागरिकांना तीन ठिकाणी अटक केली.

vishwatmaklokswamivarta

मालेगावात महापौर निवडणुकीनंतर मोठी दुर्घटना, मनपा सभागृहातील लिफ्ट अडकली

vishwatmaklokswamivarta