vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करावी. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. महिन्याच्या कालावधीत याबाबत कार्यवाही पूर्ण व्हावी, असे निर्देश, कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले

नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.तर प्रत्यक्ष बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी उपस्थित होते.

सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आस्थापनांची नोंदणी आणि खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही मंडळाची मुख्य जबाबदारी आहे. ही कामे नियमित आणि प्रभावीपणे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास संबंधित आस्थापनांवर आवश्यक नियंत्रण आणणे शक्य होईल, असेही मंत्री ॲड फुंडकर त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५० सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याने रायगडमधील स्थानिक युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित आहेत. सध्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर २ हजार ५३१ सुरक्षा रक्षक असून, त्यांच्या नियुक्तीद्वारे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा अभिप्राय मंडळाने व्यक्त केला.

याबाबत ठाणे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देशही कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

17 नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.

सरदार@१५० एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे युवांच्या सहभागाने लवकरच राज्याचे सर्वंकष युवा धोरण साकारणार; युवक-युवतींना सूचना देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

सीएनजी महागला , सीएनजीच्या दरात आज दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू