vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षण कार्यक्रम

 

नाशिक, प्रतिनिधी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), नाशिक यांच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने 22 ते 24 मे 2026 या कालावधीत जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पात्र इच्छुकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्‍प अधिकारी आरती शेलोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रशिक्षण सहभागासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तीन दिवसीय प्रशिक्षणात ई-टेंडर बघणे व भरणे, बीओक्यु प्रक्रिया, ई-टेंडर डाऊनलोड करणे, ई-टेंडरिंगची वेबसाईट नोंदणी, आवश्यक सॉफ्टवेअर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, एल-1-टेंडर प्रक्रिया, विक्रेता व्हेंडर नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, शासकीय ठेकेदार होण्यासाठी मार्गदर्शन, आयात व निर्यात परवाना, उद्यम नोंदणी, दुकान कायदा परवाना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना, आयकर, जीएसटी, टीडीएस, जेम पोर्टल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक, 11, उद्योग भवन शासकीय आय.टी.आय जवळ, त्र्यंबकरोड, सातपूर, नाशिक येथे अथवा मोबाईल क्रमांक 8766738318, 9168667167 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्रीमती शेलोरकर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मिरजेत दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा 

vishwatmaklokswamivarta

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा !एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta