vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामास मंजुरी

ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामास मंजुरी

नाशिक, प्रतिनिधी : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम राज्य शासनातर्फे सुरू आहे. या विस्तारीत कामाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र मुख्य सुरक्षा अधिकारी, ओझर विमानतळ यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामास आता वेग येणार आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे ओझर विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत तीनपट वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ विस्तारीकरण बांधकामाचा आराखडा मंजुरीसाठी नागरी विमान उड्डाण विभागाकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यात नवीन ॲप्रॉनचे बांधकाम, विद्यमान ॲप्रॉनचा विस्तार आणि संबंधित नवीन टॅक्सी वेसाठी संकल्पना/आराखडा आदींचा समावेश आहे.

या कामाला आता एरोड्रम सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. विस्तारीकरणाचे काम करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच विमानांच्या संचालनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला दररोज कळवावी. जेणेकरून विमानतळावरील कामांची सूचना संबंधितांना दिली जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे.

ओझर विमानतळ विस्तारीकरणाच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे या कामाला गती येणार आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच शासनातर्फे विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात-सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७

सेलू येथे ‘नमो उद्याना’चे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन सेलूच्या विकासाला नवी गती; स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प —पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके