vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

 सांगली, प्रतिनिधी कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून दाखवून, त्याबाबत सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन केले. जुना पद्माळे रोड, सांगली येथे प्रदीप रामगोंडा पाटील यांच्या मळ्यात झालेल्या या प्रात्यक्षिकावेळी उपकृषि अधिकारी प्रदीप माळी, सहाय्यक कृषि अधिकारी दिलीप मिरेकर उपस्थित होते.

 यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी म्हणाले, जे शेतकरी सोयाबीन किंवा भुईमुग करणार असतील, अशा सर्व शेतकऱ्यांनी प्रथमतः त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच बियाण्याची पेरणी करावी. यामध्ये शेतकऱ्यांनी प्रथमतः एक सुती गोणपाट घेऊन ते पाण्याने ओले करावे. त्यावर 100 बिया ठेवाव्यात. नंतर ते गोणपाट गुंडाळी करून त्याला दोन्ही बाजूंनी दोरीने बांधून त्यावरती 5 ते 6 दिवस पाणी मारावे. त्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करावी. त्यामध्ये जर 70 बियाण्याला कोंब आले असेल तर ते बियाणे पेरणीयोग्य आहे असे समजावे. यावेळी शेतकऱ्यांना सहजपणे समजावे याकरिता बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक डेमो ही दाखविण्याकरिता आणण्यात आला होता.

 कार्यक्रमासाठी शेतकरी प्रदीप पाटील, शिवाजी चौगुले, जयवंत पाटील, प्रमोद पाटील, अंजुम महात, प्रकाश पाटील, दिलीप बोळाज व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री कार्यालय(जनसंपर्क कक्ष)महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता..

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

१०वी, १२ वी कॉपीमुक्त परीक्षा; मनाई आदेश, भरारी पथकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात ‘ #महाभूसंपादनपोर्टल ’चा #शुभारंभ‘महाभूसंपादन पोर्टल’मधून #ऑनलाईन पद्धतीने होणार #भूसंपादन प्रक्रिया

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची स्वामी नारायण मंदिर येथे भेट* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन