vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेलू येथे ‘नमो उद्याना’चे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन सेलूच्या विकासाला नवी गती; स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प —पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू येथे ‘नमो उद्याना’चे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन सेलूच्या विकासाला नवी गती; स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प —पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणी, प्रतिनिधी सेलू शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत नागरिकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. ‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, आगामी काळात सेलूचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

सेलू नगरपरिषदेच्या “नमो उद्याना”चे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड बांधकाम सभापती मनीष कदम आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, आज सेलूकरांच्या सेवेसाठी ‘नमो उद्यान’ लोकार्पित करताना मला विशेष आनंद होत आहे. नागरिकांना एक सुंदर आणि उपयुक्त उद्यान उपलब्ध करून देत आहोत. सेलू शहराचा सर्वांगीण विकास करून मराठवाड्यातील एक विकसित आणि आधुनिक शहर म्हणून सेलूची ओळख निर्माण करण्याचा माझा मानस आहे. आगामी काळात सेलू शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे केली जाणार आहेत.

शहरात क्रीडांगणासाठी सुमारे सात एकर जागा उपलब्ध आहे. आतापर्यंत या ठिकाणी सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, हे क्रीडांगण आणखी सुंदर आणि दर्जेदार कसे करता येईल, यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. आपली मुले निसर्गाशी जोडली गेली पाहिजेत. त्यांचा मोबाईलचा वापर कमी झाला पाहिजे आणि खेळाकडे त्यांचा कल वाढला पाहिजे. यासाठी क्रीडा सुविधांना अधिक प्राधान्य दिले जाईल.‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यातूनही सेलूसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुंदर आणि सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

सेलूमध्ये आयटीआयच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे तरुणांना कौशल्याधारित शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. मला विशेष आनंदाने सांगावेसे वाटते की, सेलू सारख्या तालुक्याच्या ठिकाणी महिला आणि बालकांसाठी पहिल्यांदाच ५० खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. लवकरच या रुग्णालयाचे लोकार्पण केले जाईल. तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅथलॅबसुद्धा सुरू करण्यात येणार आहे. सेलू येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय आणले आहे. या ठिकाणी लवकरच प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे.हातगाव येथील १३२ के.व्ही. उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे स्वच्छ आणि प्रदूषण विरहित उर्जेसाठी नागरिकांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा’ लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

येत्या काळात सेलू शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था, गॅस पाइपलाइन यांसह विविध महत्त्वाची विकासकामे केली जाणार आहेत. या सर्व विकासकामांमुळे आगामी काळात सेलू शहराचा कायापालट झालेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी तर मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आभार मानलेयावेळी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या देववन मियावाकी घनवन प्रकल्पाला भेट दिली. तसेच मोकाट श्वान (ABC सेंटर) निर्बीजीकरण व निवारा केंद्र कामाची त्यांनी पाहणी केली.

***

 

संबंधित पोस्ट

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार..

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

गुंतवणुकदारांसाठी रेड कार्पेट, उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – विजयलक्ष्मी बिदरी नागपूर विभागाच्या गुंतवणुकदार परिषदेमध्ये ६ हजार कोटीचे सांमजस्य करार