vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गुंतवणुकदारांसाठी रेड कार्पेट, उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – विजयलक्ष्मी बिदरी नागपूर विभागाच्या गुंतवणुकदार परिषदेमध्ये ६ हजार कोटीचे सांमजस्य करार

गुंतवणुकदारांसाठी रेड कार्पेट, उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – विजयलक्ष्मी बिदरी,नागपूर विभागाच्या गुंतवणुकदार परिषदेमध्ये ६ हजार कोटीचे सांमजस्य करार…

नागपूर, प्रतिनिधी: विदर्भात विविध क्षेत्रात झालेल्या सांमजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये रुपांतर व्हावे, यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व विभागीयस्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योजकांनी मोठया प्रमाणात विभागात गुंतवणूक करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे विभागीयस्तरावर गुंतवणूक परिषद – 2025 चे आयोजन येथील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले. या परिषदेत 152 उद्योजकांचे 6 हजार 100 कोटी रुपयांचे सामंज्यस्यकरार श्रीमती बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष झुलपेस शहा, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष पी.मोहन, बुटीबोरी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर मालविया, मैत्रीचे समन्वय अधिकारी भास्कर मोराडे, सिडबीचे सहायक महाव्यवस्थापक संतोषराव मोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार तसेच उद्योजक, गुंतवणुकदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय गुंतवणुकदार परिषदेमध्ये गोदिंया येथे एक्सलोपॅक इंडिया लिमिटेड या हायटेक पेपर इंडस्ट्रिज व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनीतर्फे 950 कोटी, तसेच पेपर उद्योगात 225 कोटी रुपयांच्या गुंतवणुकी संदर्भात शशांक मिश्रा यांनी केली आहे. बुटीबोरी येथे इंनव्हेन्टीस रिसर्च कंपनीतर्फे औषध व रासायनिक निर्मिती क्षेत्रात 700 कोटी रुपयाची गुंतवणूक, हॉटेल ताज गेटवे (पीडी प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात 400 कोटी, हयात हॉटेल (रचना प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात 300 कोटी रुपये फेयर व्हॅल्यु हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात 131 कोटी 30 लक्ष रुपये, हॉटेल हिलटॉन तर्फे पर्यटन क्षेत्रात 175 कोटी रुपये, विठोबातर्फे 100 कोटी रुपये आदी 125 उद्योजकांनी 6 हजार 100 कोटी रुपयाचे सामंजस्य करार यावेळी केले.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील भूमिहीनांना मोफत शेतजमीनकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ; प्रस्ताव ५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

भाजपा सक्रीय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आखणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा घेतला आढावा- उद्योजकांशीही साधला संवाद, कामगारांचे केवायसी करण्याच्या सूचना

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta