vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आखणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा घेतला आढावा- उद्योजकांशीही साधला संवाद, कामगारांचे केवायसी करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आखणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा घेतला आढावा- उद्योजकांशीही साधला संवाद, कामगारांचे केवायसी करण्याच्या सूचना

             सांगली, प्रतिनिधी: कुपवाड औद्योगिक विकास क्षेत्र पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारखाने व मोठ्या संख्येने कामगार आहेत. त्यातील बऱ्यांच कामगारांची कौटुंबिक व गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती नसते. बऱ्याचदा कामगार म्हणून त्यांच्या परस्परातील संघर्षातून गुन्हे घडतात. अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे आव्हान आहे. मात्र, त्यावर मात कशी करता येईल, यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात येतील. त्यातील एक भाग म्हणून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील कामगारांचे प्रथम टप्प्यात केवायसी व पुढील टप्प्यात चारित्र्य पडताळणी करण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

  पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नजीकच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना भेट देऊन तिथे कार्यरत समित्यांचा आढावा घेणार आहेत व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्याची सुरवात एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याला भेट, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा व उद्योजकांशी संवाद या माध्यमातून झाली. यावेळी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाज आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.नजीकच्या कालावधीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना भेट व आढावा बैठक आयोजित केली जाईल. यावेळी संबंधित पोलीस ठाण्याची माहिती, कायदा व सुव्यवस्था, आव्हाने यांचा आढावा घेतला जाईल. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गुन्हेगारी वृत्तीवर, गुन्हेगारांवर धाक निर्माण होण्यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत. याचबरोबर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे केवायसी करणे बंधनकारक करण्यात येईल. पुढील टप्प्यात चारित्र्य पडताळणी करण्यात येईल. नवीन पोलीस चौकीसाठी आवश्यक परवानग्यांसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन फिरत्या चौक्यांच्या पर्यायही विचारात घेण्यात येईल, असे स्पष्ट करून त्यांनी कुपवाड औद्योगिक विकास क्षेत्रात पथदिवे बसवणे, सीसीटीव्ही लावणे, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिरोधक किंवा रंबलर्स करणे, वाहनतळ विकसित करणे आदिबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले. एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेऊन त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल वेळीच होत आहे. आरोपींवर आरोपपत्र दाखल होत आहे. आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी गेल्या आठवड्यात चार जणांना तडीपार करण्यात आले आहे. मकोका व तडीपारीच्या प्रकरणांवर पोलीस विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. या बाबी समाधानकारक असल्या तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या अनुषंगाने व गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी तंटामुक्त समित्या पुनर्गठित करण्याचे सूचित करण्यात आल्या आहेत. पोलीस काका व पोलीस दीदींनाही नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्याच्या अनुषंगाने सखोल चर्चा केली. या अनुषंगाने कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कारखानदार आणि नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. सांगली मिरज कुपवाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार, उद्योजकांच्या समस्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे त्यांनी सूचित केले.

00000

संबंधित पोस्ट

प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta