vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत अभियान’जाणीव जागृतीसाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात आजपासून दि. १५ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत ‘नशामुक्त भारत अभियान’ विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, नर्सिंग स्कूल, आयटीआय आणि कोचिंग क्लासेसमध्ये जनजागृती केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने जनजागृती रॅली , चर्चासत्रे,सामूहिक नशामुक्ती प्रतिज्ञा ,निबंध व चित्रकला स्पर्धा,कलापथक आणि पथनाट्ये,विशेष व्याख्याने या द्वारे जाणीव जागृती करण्यात करण्यात येणार आहे.

मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत आणि समितीचे सदस्य विलास चंदने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचं लोकार्पण

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.29 सप्टेंबर पर्यंत मुमुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta