vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 

नांदेड प्रतिनिधी- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी ते जून 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 2 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 4 मे, 3 जून 2026 यादिवशी आहे. धर्माबाद येथे 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 6 मार्च, 6 एप्रिल, 6 मे, 5 जून 2026 यादिवशी करण्यात आले आहे. किनवट येथे 9 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 9 मार्च, 9 एप्रिल, 11 मे, 10 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. मुदखेड येथे 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 एप्रिल, 13 मे, 12 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. माहूर येथे 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्च, 15 एप्रिल, 15 मे, 15 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हदगाव येथे 19 जानेवारी, 18 फेब्रुवारी, 18 मार्च, 17 एप्रिल, 18 मे, 18 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. धर्माबाद येथे 23 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 23 मार्च, 23 एप्रिल, 22 मे, 22 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हिमायतनगर येथे 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 27 मार्च, 27 एप्रिल, 26 मे, 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. किनवट येथे 30 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 29 मे , 29 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वरील शिबिराच्या दिवशी स्थानिक सुटटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेमध्ये बदल होवू शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.

जालना येथील श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना*‍*मुलांना मिळणार वनांची माहिती*