vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, प्रतिनिधी: मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी तेथील ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचे जाहीर गायन करून सामाजिक जबाबदारीने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतात. यामधून गावामध्ये देशभक्तीची जोपासना केली जात आहे. याचबरोबर अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमही येथे राबविले जातात, अशा शब्दात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक केले

कर्नाळ ग्रामपंचायत येथे कर्नाळ ग्रामपंचायतच्या सहकार्यातून व रोड स्पेन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी गावातील सर्व नागरिक राष्ट्रगीतासाठी उभे राहत असतात. या राष्ट्रगीतामुळे गावामध्ये राष्ट्रभक्ती, एकता, बंधुता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्यक्ष कर्नाळ गावास आज भेट देऊन राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला व या उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच रोहन एडके, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, परिविक्षाधीन गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, तलाठी पुष्पलता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, रोड स्पिन वॉरियर्स ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते, संदेश कदम, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक प्रतिनिधी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी, दिव्यांग संघ प्रतिनिधी, गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राष्ट्रगीत गायन उपक्रमामध्ये कर्नाळ गावातील ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक सर्वजण सहभागी होतात. ग्रामपंचायतीने खूप मेहनतीने अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र, अत्यंत स्वच्छ आणि देखभाल ठेवलेली आहे. वाचनालयामध्ये जवळ जवळ 70 हजारांच्या वर पुस्तके आहेत. येथील ग्रामस्थ अत्यंत विचारपूर्वक आणि भविष्यकालीन उपक्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची गोडी निर्माण केलेली आहे, याबद्दल त्यांनी कर्नाळ गावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, कर्नाळ गावात चांगल्या प्रकारे प्रगती सुरू आहे. गावात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राष्ट्रगीत गायन, चित्रकला स्पर्धा घेणे, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक काम, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे चांगले नियोजन केले आहे. तसेच दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून महिलांच्या आरोग्याची काळजी सुद्धा येथे घेण्यात आलेली आहे. याबद्दल त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ग्रामपंचायत कर्नाळ, कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन व रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ येथे आयोजित 175 विद्यार्थ्यांची निसर्ग चित्र व व्यक्ती शिल्प स्पर्धा या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच कर्नाळ येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1, अंगणवाडी क्रमांक 139 या ठिकाणीही भेट देऊन पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आरोग्य केंद्र, (खाजगी) ग्रंथालय येथेही भेट देऊन पाहणी केली.

00000

संबंधित पोस्ट

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सुचना..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन-2023 पुस्तिकेचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे  यांनी नागपूर दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना दणका , मनसेची कार्यकारिणीच बरखास्त तर. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेला कसा याची चौकशी

vishwatmaklokswamivarta

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस: महिला आरक्षण राजीव गांधी यांचं स्वप्न, नारी शक्ती वंदन विधेयकाला कॉंग्रेसचा पाठिंबा – सोनिया गांधी

vishwatmaklokswamivarta