vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

रायगड, प्रतिनिधी :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि. 29 जुलै 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 29 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.30 जुलै 2025 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्षण (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षण विचार केला जाणार नाही. सदर अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवह्न अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

सदर धनाकर्षण (DD) RTO PANVEL यांच्या नांवे नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बँकेचा असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जदाराने अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा धनाकर्षण (DD) (फक्त एकच) या सिलबंद पाकीटात जमा करावा. आकर्षक क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोबत असणारे धनाकर्षण अर्ज स्विकारणाऱ्या दिवसापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेलले धनाकर्षणाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले धनाकर्षण (DD) सुद्धा बाद केले जातील. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

आकर्षक क्रमांकासाठी आगाऊ स्वरुपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय नवीन मालिका सुरु होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षण च्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय नवीन मालिकेतील पावत्या जारी केल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

 

000000

संबंधित पोस्ट

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

जिजा ने साले की शादी 21 किलो फुलो का हार तोहफे शादी समारोह मे दुल्हा दुल्हन को पहनाया- उत्तर प्रदेश के जिला प्रतापगढ़ गाँव बंसी पुरवाइसअनोखे उपहार की पुरे जीले में चर्चा..

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन