vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

रायगड, प्रतिनिधी :-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित्त आहे. यामध्ये निर्लेखित झालेले यंत्रसामुग्री व उपकरणे इत्यादी साहित्याचा समावेश असून या निविदा प्रक्रियेकरीता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन.एस.पुरकर यांनी केले आहे.

विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधीत विभागामध्ये दि. 25 जुलै ते दि.2 ऑगस्ट 2025 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/-(अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल.

सदर नमुन्यातील पूर्ण माहीती अचुक पणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सदर रक्कमेचा भरणा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड या नावाने डी.डी.च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदी दारांनी वर उल्लेख केलेल्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज डी.डी. सह (प्रपत्र अ व प्रपत्र ब करीता वेग्ळे स्वतंत्र लिफाफा द्यावा) दि.2 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त सुटीचे दिवस वगळून सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा करावा.

संपूर्ण निविदा प्रक्रीया रदद करण्याची किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड जि. रायगड यांनी राखून ठेवला आहे. सदर सिलबंद निविदा दिनांक04 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.30 वा. संस्थेच्या प्राचार्याच्या कक्षात उघडण्यांत येतील .

000000

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…