vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याम्साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी या पोर्टलद्वारे राबविली जाते. त्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज मुख्याध्यापकांनी ऑनलाईन भरुन घ्यावे व योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.
योजनेचा तपशिलः- इयत्ता ९ वी, १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांचाही समावेश, इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती.
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धतीः- अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्याध्यापकांकडे सादर करावे, संबंधित मुख्याध्यापकांनी आपल्याकडील अर्ज ऑनलाईन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगईनवर सादर करावे. संबंधित गटशिक्षण अधिकारी यांनी अर्जांची तपासणी करुन पात्र व परिपूर्ण अर्ज जिल्हास्तरावरील समाजकल्याणच्या लॉगईनवर सादर करावे.
शहरातील, महनगरपालिका क्षेत्रातील , अनुदानित, ग्रामिण भागातील जिल्हा परिषद, अनुदानित खाजगी शाळांनी सन २०४- २५ मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावे. कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची संबधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी , प्रशासन अधिकारी यांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ…

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..