vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

 

 

सातारा प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे सातारा जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज व साताऱ्याचे खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी आवर्जून स्वागत केले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न पत्रकार मांडत असतात. पण पत्रकारांचेही स्वतःचे त्यांच्या विस्तीर्ण समूहाचे प्रश्न असतात. भविष्यात केंद्र व राज्य स्तरावर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली कायम साथ असेल, असे यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. समितीने खासदार उदयनराजे भोसले यांना या आपुलकीच्या स्वागताबद्दल धन्यवाद दिले.

यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, समिती सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, अमन सय्यद, पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.

सातारा येथे झालेल्या या बैठकीत पुणे, सोलापूर, व सातारा या जिल्ह्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृतिपत्रिकांच्या नूतनीकरण व पडताळणी बाबतचे कामकाज पार पडले.

संबंधित पोस्ट

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना 34 टन शाडू मातीचे मोफत वाटप!उप आयुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्याकडून शाडू मातीचे वितरण व गणेशमूर्ती कारखान्याला भेट..

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा कराअन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा