vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई, प्रतिनिधी :- पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा, इंधनाचा आणि मनस्तापाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय, या महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे दुर्दैवी आहे.

तसेच, नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे डायव्हर्जन आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. या मार्गावरही गंभीर अपघात घडत असून या दोन्ही महामार्गांची सखोल पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*