vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

*जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

 

​गडचिरोली, प्रतिनिधी] – जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण 68 सदस्य जागांसाठी निवडणूक होणार असून यात जिल्ह्याभरातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

*​नगर परिषद निहाय तपशील*गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक 43,513 मतदार असून, त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे.देसाईगंज नगर परिषदेत एकूण 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल.

​आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, जे 27 मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण 20 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

*​आरक्षण आणि महिला प्रतिनिधीत्व*या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण 68 सदस्यांपैकी तब्बल 35 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.प्रवर्गनिहाय राखीव जागांची माहिती: एकूण 68 जागांपैकी ३१ जागा सर्वसाधारण, १८ जागा नामाप्र (नामांकित मागास प्रवर्ग) साठी, 11 जागा अनुसूचित जाती आणि 8 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

​महिला आरक्षणाचा तपशील: गडचिरोली नगर परिषदेतील 27 पैकी 14 जागा, देसाईगंज नगर परिषदेतील 21 पैकी 11 जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील 20 पैकी 10 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. यामध्ये विविध प्रवर्गातील स्त्रियांना संधी मिळाली आहे. गडचिरोलीत सर्वसाधारण गटातील 6 जागा, देसाईगंजमध्ये सर्वसाधारण गटातील 6 जागा आणि आरमोरीमध्ये सर्वसाधारण गटातील 3 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.

संबंधित पोस्ट

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

vishwatmaklokswamivarta

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिवादन*