vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

सांगली, प्रतिनिधी : कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभागामधील अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या निविष्ठा विक्री केंद्रांची तसेच निविष्ठा व संजीवके यांच्या उत्पादन स्थळांची 100 टक्के तपासणी करावी. तपासणी करताना अनियमितता आढळून आल्यास मार्गदर्शक सूचनानुसार कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांची रब्बी हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत विविध खते व बियाणे उपलब्ध होण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खताची कमतरता नाही. रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना माहितीसाठी प्ले स्टोअर वरील कृषक या अॅप वर दर दिवशीचा तालुकानिहाय व कृषि सेवा केंद्र निहाय साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये काही तक्रारी असल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निराकरणासाठी भेटी द्याव्यात. तक्रार करण्यासाठी 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषक अॅप वापरण्याची कार्यपद्धती- प्ले-स्टोअर – कृषक अॅप – चावडी – खत उपलब्धता- जिल्हा- तालुका – तालुक्यातील कृषि सेवा केंद्र निहाय उपलब्ध खत साठा दिसेल. तालुकानिहाय व ग्रेडनिहाय साठा – मे.टन मध्ये पुढीलप्रमाणे –अ.क्र,तालुका युरिया,डी.ए.पी एम.ओ.पी,एन.पी.के.एस,एस.एस पी१,आटपाडी,९२३.८२१,५३.८५,७१.७,३६८.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्हा सरासरी पाऊस (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०६.२०२५ (मिमीमध्ये)

कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यातही पोलीसपाटलांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी