vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान बुलढाण्यात आरोग्य सेवांचा घेतला आढावा; अभियान प्रभावी राबविण्याच्या सूचना

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान बुलढाण्यात आरोग्य सेवांचा घेतला आढावा; अभियान प्रभावी राबविण्याच्या सूचना…

बुलढाणा प्रतिनिधी: राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य समन्वयक अमोल पाटील यांनी गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

 

यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी बुद्रुक (ता. बुलढाणा), प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा (ता. चिखली), संबंधित उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे भेट देऊन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. आरोग्य सेवा, जनजागृती उपक्रम, नोंदवही, नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीची त्यांनी सविस्तर पाहणी केली.

 

भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्यासमवेत अभियानाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी राज्य समन्वयक अमोल पाटील यांनी ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी नियोजन, विभागीय समन्वय आणि लोकसहभागाच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 

या भेटीदरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ, डॉ. विष्णू इंगळे, डॉ. मोहम्मद मुदस्सीर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवून निरोगी ग्राम आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न कावीळ संसर्ग कमी करण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत 85% इतके उल्लेखनीय काम महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस29 जूनपासून घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना करणार लसीकरण

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

vishwatmaklokswamivarta