vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दि. ८ एप्रिल ते दि. १४ एप्रिल २०२६ या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत असून, या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आवार,शासकीय अधिकाऱ्यांचे क्रीडा संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रवींद्र शेळके, तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार, तहसीलदार (सर्वसाधारण) डॉ. शितल रसाळ, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण माधुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला

रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले

०००

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप१२२ शिबिरांमध्ये १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी ; ३,१२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी

जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन; होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे होणार वितरण..

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी-नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु*

vishwatmaklokswamivarta

पिंपळगाव देवी येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर