vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने दि. १२ एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व मेळावा जेष्ठ नागरिक संघ हॉल, नागाव (ता. अलिबाग) येथे पार पडला. हा कार्यक्रम सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास श्रीम. राजश्री म्हात्रे, श्री. श्रीयश खरोटे तसेच समाज कल्याण विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सोरटे यांनी जेष्ठ नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. राजश्री म्हात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीयश खरोटे यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

0000

संबंधित पोस्ट

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

मराठवाड्याचा औद्योगिक आढावा-औद्योगिक परिसंस्था विकसीत करा- उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये होणार पहिला टप्पा 16 मे ते 15 जून कालावधीत…

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-