vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा-2026 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते.

या बैठकीस युवराजनी श्रीमती संयोगिता राजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, दुर्गराज रायगड समितीचे सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक किल्ले रायगड येथे येत असतात. यावर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग,पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रसाधनगृह, परिवहन व्यवस्था तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले. तसेच पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गावर लाईट व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमाराठी साउंड सिस्टम आदी कामे संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली 

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक

vishwatmaklokswamivarta

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta