vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यांवर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट तैनात

जिल्ह्यातील नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यांवर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट तैनात

राज्य प्रतिनिधी-नियोजन विभागाच्या “गतीमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेअंतर्गत जिल्हा पोलीस विभागास अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण करण्यात आहे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या प्रसिद्ध व गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक वॉटर क्राफ्ट (रिमोट ऑपरेटिंग बोया) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूरस्थितीत अडकलेल्या व्यक्तींचे बचावकार्य तसेच औषधे व मदत पोहोचविण्यासाठी या उपकरणांचा प्रभावी वापर होणार आहे.

यामध्ये 125 सर्च लाईट, 45 मेगा फोन, 5000 मीटर दोरखंड, 50 टपारिया टूलबॉक्स, 3 आधुनिक ड्रोन, 1000 फ्ल्युरोसंट जॅकेट्स, 30 नाईट व्हिजन बायनाक्युलर्स, 25 रेस्क्यू रोप गन, 150 बॉडी बॅग, 50 आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू किट, 4 किलो DCP क्षमतेचे 200 अग्निशमन यंत्र तसेच 400 वॅटचे 30 इमरजन्सी लाईटनिंग टॉवरचा समावेश आहे.

राज्य शासनामार्फत इनोव्हेटिव्ह लाईफ जॅकेट, फोल्डेबल व मल्टीपरपज स्ट्रेचर, हेल्मेट, सेफ्टी नेट, गमबूट, हॅण्ड ग्लोव्हज, रॅपलिंग रोप आदी 10 प्रकारचे बहुपयोगी आपत्ती व्यवस्थापन किट जिल्ह्यातील 28 पोलीस ठाणे व 10 पोलीस चौक्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य पोलीस विभागास वितरित करण्यात आले. तसेच, दि. 10 एप्रिल 2026 रोजी जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या साहित्याच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले

या प्रशिक्षणावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, प्रशिक्षक एम. के. म्हात्रे आणि डॉ. वेदव्यास माने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..

कुष्ठरुग्ण शोध अभियान 2025

vishwatmaklokswamivarta

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, दगडूशेठची मिरवणूक सुरु, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा पाणी परिषद पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

उपमुख्यमंत्री कार्यालय(जनसंपर्क कक्ष)महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता..

vishwatmaklokswamivarta