vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला,  मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक…

मुंबई प्रतिनिधी-

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील एका सुनियोजित कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. या जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे.

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी या महिला प्रवाशाला आगमन होताच अडवले. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता, पांढरी पावडर असलेली 2 अन्न पाकिटे, पांढरी पावडर असलेला 1 प्लास्टिकचा कंटेनर आणि पांढऱ्या पावडरच्या गोळ्या असलेली 1 छोटी पिशवी आढळून आली. अधिकार्‍यांनी या प्रवाशाने गिळलेल्या दोन कॅप्सूलदेखील जप्त केल्या. एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून जप्त केलेल्या पदार्थांची चाचणी केली असता, ते कोकेन असल्याचे सिद्ध झाले.

हा प्रतिबंधित माल मादक द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला असून, प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नशा मुक्त भारत’ निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पावर डीआरआय ठाम आहे. अमली पदार्थांना रोखणे, आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेट्स उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांचे, विशेषतः तरुणांचे, अमली पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी डीआरआय अथकपणे कार्यरत आहे.

संबंधित पोस्ट

पावसाळ्यापूर्वी सांगली पेठ रस्त्याचे काम पूर्ण कराव- जिल्हाधिकारी 

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

शिक्षा एवम जनसेवा संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण