vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी आरटीओ पुणे येथे अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

पुणे प्रतिनिधी-प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे परिवहन (ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू) वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून, आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

खाजगी चारचाकी वाहनांसाठी इच्छुक नागरिकांनी विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल

ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांसाठी इच्छुकांनी दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता लिलाव होईल.डिमांड ड्राफ्ट “R.T.O., Pune” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेतून काढलेला असावा. लिलावाकरिता डीडी एकाच सीलबंद पाकिटात जमा करणे बंधनकारक आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी परत मिळणार नाही, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

0000

0

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची बेकायदेशीर बांधकाम धडाकेबाज कारवाई सुरू घणसोली विभागात अतिक्रमण विरोधी कारवाई

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..