vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील मौजे मांडा येथील श्री. विनायक आशिष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीवर इंडस कंपनीने मोबाइल टॉवरची उभारणी केली आहे. या टॉवरमुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार येथील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार या इमारतीवरील टॉवर काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या मोबाईल टावर कारवाई बाबत सदस्य नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव, कृष्णा खोपडे, वरुण सरदेसाई यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, मोबाईल टॉवर उभ्या करणाऱ्या इंडस कंपनीने रहिवाशांचा विरोध जुगारून महापालिकेद्वारा सील केलेल्या टॉवरचा सील तोडून विनापरवानगी प्रक्षेपण सुरू केले. ही बाब कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या निदर्शनास येताच पालिकेने सदर टॉवर अनधिकृत घोषित करून निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आता या टॉवरला काढून टाकण्याचीच कारवाई करण्यात येणार आहे.

0000000

 

संबंधित पोस्ट

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कु. श्रेयांश व कु. काशि यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी ठाणे बाल कल्याण समिती किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ यांच्याशी संपर्क साधावा

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत ४ हजार ७४० नागरिकांना घरपोच दाखले देण्यात यश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस