vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

जालना (प्रतिनिधी) : शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला तत्काळ अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शुक्रवार दि. २१ रोजी मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हयासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही समाजकंटक हेतुपुरस्सर अवमान होईल, अशी टीका टिप्पणी करतात व त्यावर शासन कठोर कायदेशीर कारवाई करताना दिसत नाहीत उलट अशा आरोपींना पोलीस, सरकार फरार होण्यासाठी मदत करत असल्याचे दिसुन येत आहे. हे अतिशय गंभीर आहे. गुन्हेगार सोशल मिडीयात आपली जाहीर भूमिका मांडतात. जामिनासाठी राजरोस फिरतात मात्र पोलिसांना गुन्हेगार सापडत कसा नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना तातडीने अटक करून, राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत. शिवद्रोह्यांना राज्यसरकार जी महत्वाची वागणूक देत आहे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही गुन्हेगारासम कठोर कारवाई करत उचलून आणून अटक करत नाही, तसेच त्यांच्या पाठीमागील मास्टरमाईंडचा शोध घेत नाही किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही ही वस्तुस्थिती आहे. याच प्रवृत्तींनी अश्याच प्रकारे यापूर्वीसुध्दा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सुध्दा असंस्कृत, विकृत, घाणेरडी विधाने केली होती. परंतु राज्यसरकारने बोटचेपी भुमिका घेतल्यामुळे अशा राष्ट्रद्रोही शक्तीचे मनोबल वाढले आहे म्हणून या गुन्हेगारावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करून इतरांना जरब बसवावी. मराठ्यांच्या व रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या अत्यूच्च शौर्याचे निशाणी औरंगजेबाची कबर असून ती उखडून टाकण्याचे जे षडयंत्र रचले जात आहे हे मराठा इतिहासावर जबरदस्तीचे सांस्कृतिक व ऐतिहासिक आक्रमणच आहे. लक्ष्मण ऊत्तेकराने छावा मध्ये शिर्के घराण्यांचा खोटा इतिहास दाखवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर मृत्यूला औरंगजेब सह कुठल्या तत्कालीन धार्मिक शक्ती व सल्लागार जबाबदार आहेत त्याचेही सत्य शासनाने जनतेसमोर आणले पाहिजे. सर्वसत्ताधीश मुघल बादशहा औरंगजेब याला झुंजवत याच महाराष्ट्र भुमित गाडला अशा रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचे भव्य अश्वारूढ स्मारके मुंबईत मंत्रालयासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऊभे करावेत आणि त्यांचा फोटो मंत्रालय प्रवेशद्वार ते सर्व शासकीय कार्यालयात तातडीने लावावेत तसेच शालेय, महाविद्यालय, संशोधन २ अभ्यासक्रमात रणरागिणी ताराराणी चा शौर्याचा इतिहास समाविष्ट करावा.रणरागिणी छत्रपती ताराराणी व छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे साता-यातील समाधीस्थळ उचित दर्जाचे बांधकाम करून शासकीय इतमामात पुजा दिवाबत्ती करणेचा निर्णय तातडीने करावा. दिल्लीच्या तालकटोरा येथे मराठा विर पेशवा बाजीराव पहिला, श्रीमंत महादजी शिंदे, श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्यासह तत्कालीन छत्रपती शंभुपुत्र शाहू महाराज यांचाही छत्रपतीच्या इतमामाला साजेसे स्मारक ऊभे केले पाहिजे.आरेस्सेस प्रमुख मोहन भागवत आणि सावरकर स्मारक चे रणजित सावरकर यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांनी त्यांच्या साहित्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवशाही, स्वराज्य यासंदर्भात जे अनैतिहासिक, बेजबाबदार, बदनामीकारक लिखाण समाविष्ट आहे केले आहे आणि शौर्या ऐवजी असाच मजकूर इंटरनेट महाजाळातून जगभर जात आहे आणि या युगप्रवर्तक महापुरुषांची बदनामी होत आहे. तरी तातडीने हा असा मजकूराचा भाग वगळण्यात यावा आणि पुढील आवृत्तीत समाविष्ट करू नये यासाठी शासनाने तात्काळ कायदेशीर प्रतिबंध करावा. या सर्व मागण्यांवर तात्काळ कारवाई करावी नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन करण्याचा करण्यात येईल. याची गंभीर नोंद घ्यावी असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. संजय लाखे पाटील, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अक्षय गोरंट्याल, रमेश गव्हाड, दत्ता घुले, जगन्नाथ काकडे, संतोष गाजरे, राजेंद्र गोरे, अशोक पडूळ, सुभाष कोळकर, संदिप ताडगे, मछींद्र घोगरे, अनिल मदन, सुभाष चव्हाण, धर्मा खिल्लारे, अशोक उबाळे, सतीश देशमुख, माऊली कदम, भरत मानकर, उदय देशमुख, गणेश शिंदे, शुभम टेकाळे, करण जाधव, ऍडव्होकेट शैलेश देशमुख, सचिन कचरे, योगेश पाटील, रवी वाडेकर, अर्जुन गजर, सागर पाटील, गजानन काळे, रमेश गजर, नरसिंह पवार, सदाशिव भुतेकर, नारायण वाडेकर, राम देठे, गणेश कावळे, संतोष चाळसे, साईनाथ पवार, राम चव्हाण, राहुल गाडेकर, अनिरुद्ध शेळके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान -देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

सुधागडातील सर्व समाज एकत्र येणार! महाराष्ट्रातील सर्वात पहिलीच क्रांतिकारी घटना!!