vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

            मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या २८ वर्षे मुदतीच्या ८०० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धपत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ एप्रिल २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २१ एप्रिल २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ एप्रिल २०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील

00000

संबंधित पोस्ट

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

विद्युत विभागाने अखंड व दर्जेदार वीजपुरवठा देत नागरिकांच्या समस्या प्राधाण्याने सोडवाव्या*- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*ब्रेकडाऊनचे ॲनालिसिस करून तांत्रिक उपाययोजना ठरवा*

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात ११३ गावांमध्ये शिबिरे*; *१६ ते ३० जूनदरम्यान लाभार्थ्यांना विविध सेवा*_जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

शासकीय मुलींचे वसतिगृह येथे विनामुल्य प्रवेश अर्ज वाटप सुरु

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta