vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान आज 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार

नवी दिल्ली प्रतिनिधी-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाचा आणि आदर्शांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करणार,राष्ट्र प्रेरणा स्थळामध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 65 फूट उंच कांस्य पुतळे आहेत,राष्ट्र प्रेरणा स्थळामध्ये भारताच्या राष्ट्रीय प्रवास आणि नेतृत्वाचा वारसा प्रदर्शित करणारे कमळाच्या आकाराचे अत्याधुनिक संग्रहालयाची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील आणि यानिमित्त एका सार्वजनिक सभेला ते संबोधित करतील.
स्वतंत्र भारताच्या दिग्गजांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित, राष्ट्र प्रेरणा स्थळ भारतातील सर्वात आदरणीय राजकारण्यांपैकी एक असलेल्या वाजपेयी यांच्या जीवनाला, आदर्शांना आणि चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहतील. त्यांच्या नेतृत्वाने देशाच्या लोकशाही, राजकीय आणि विकासात्मक प्रवासावर खोलवर प्रभाव पाडला.
राष्ट्र प्रेरणा स्थळ हे एक ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक आणि कायमस्वरूपी राष्ट्रीय महत्त्वाचे प्रेरणादायी संकुल म्हणून विकसित केले गेले आहे. अंदाजे ₹230 कोटी खर्चून बांधलेले आणि 65 एकरच्या विस्तृत क्षेत्रात पसरलेली ही वास्तु नेतृत्व मूल्ये, राष्ट्रीय सेवा, सांस्कृतिक जाणीव आणि सार्वजनिक प्रेरणा यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित कायमस्वरूपी राष्ट्रीय संपत्ती म्हणून कल्पित आहे.
या संकुलात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ६५ फूट उंच कांस्य पुतळे आहेत, जे भारताच्या राजकीय विचार, राष्ट्र उभारणी आणि सार्वजनिक जीवनात त्यांच्या मौलिक योगदानाचे प्रतीक आहेत. येथे कमळाच्या आकाराच्या संरचनेच्या स्वरूपात निर्मित केलेले एक अत्याधुनिक संग्रहालय देखील आहे, जे सुमारे 98,000चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. संग्रहालयात भारताचा राष्ट्रीय प्रवास आणि या दूरदर्शी नेत्यांचे योगदान प्रगत डिजिटल आणि तल्लीन तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित केले जाते. यामुळे पर्यटकांना एक आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव मिळणार आहेत.
राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे निःस्वार्थ नेतृत्व आणि सुशासनाच्या आदर्शांचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

 

संबंधित पोस्ट

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत- अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

vishwatmaklokswamivarta