vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा…

नवी दिल्ली प्रतिनिधी

-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “नाताळच्या या शुभ प्रसंगी, मी सर्व नागरिकांना, विशेषतः ख्रिश्चन समाजातील माझ्या बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देते.

आनंद आणि उत्साहाचा सण असलेला नाताळ, प्रेम आणि करुणेचा संदेश देतो. हा सण आपल्याला मानवतेच्या कल्याणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या त्यागाचे स्मरण करून देतो. हा पवित्र प्रसंगी आपल्याला समाजात शांतता, सलोखा, समानता आणि सेवेची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा मिळते.

चला, आपण येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूया आणि दयाळूपणा तसेच परस्परांमध्‍ये सलोखा, एकोपा निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देणारा समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प करूया.”

 

संबंधित पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार-प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

vishwatmaklokswamivarta

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

महिलांच्या सक्षमीकरणासाठी SEVA संस्थेला राज्यस्तरीय सन्मान”“जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गौरव”

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या