vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महिलांच्या सक्षमीकरणासाठी SEVA संस्थेला राज्यस्तरीय सन्मान”“जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गौरव”

महिलांच्या सक्षमीकरणासाठी SEVA संस्थेला राज्यस्तरीय सन्मान”“जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गौरव”

ठाणे, प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरण, बालविवाह संपवण्यासाठी तसेच बाल संरक्षण आणि बाल हक्कांसाठी सातत्याने आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या सोशल एम्पॉवरमेंट अँड व्हॉलंटरी असोसिएशन (SEVA) या संस्थेला जागतिक महिला दिन 2026 निमित्त महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पवार यांनी स्वीकारला.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी SEVA संस्था अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहे. महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचे काम संस्थेने केले आहे. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.

हा सन्मान केवळ एका संस्थेचा नसून ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि स्वप्नांचा गौरव असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या यशामागे संस्थेची समर्पित टीम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पोलीस प्रशासन, सर्व सहकारी संस्था, समर्थक आणि विशेषतः स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या पुरस्कारामुळे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू असलेल्या कामाला नवी प्रेरणा मिळणार असून, पुढील काळातही ग्रामीण महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी SEVA संस्था अधिक जोमाने कार्य करत राहील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला, असे सेवा संस्था प्रकल्प समन्वयक वैभव गायकवाड यांनी कळविले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

कृषी भागाची नऊ क्षेत्रिय कार्यालये झाली आयएसओ मानांकन*

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण,पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री

ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ लाखांचे अर्थसहाय्य