vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ लाखांचे अर्थसहाय्य

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ लाखांचे अर्थसहाय्य

 

गडचिरोली, प्रतिनिधी: समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण २ कोटी २५ लाख अर्थसहाय वितरित करण्यात आले आहे.

या योजनेचे उद्दिष्ट समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हे असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचा समान (50:50) हिस्सा असतो.

वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये गडचिरोली जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला शासनाकडून एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीमधून 450 पात्र लाभार्थी जोडप्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रणालीद्वारे 31 मार्च 2025 पर्यंत हे अर्थसहाय जमा करण्यात आले.

विशेष म्हणजे, सन 2021-22 पासून प्रलंबित असलेल्या सर्व पात्र लाभार्थींनाही योजनेचा लाभ यंदा वितरित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा परिषद गडचिरोलीचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी सांगितले की, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे समाजातील जातीभेद दूर होण्यास हातभार लागेल तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मनोबल वाढेल. भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत बैठक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना;लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे• 1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर• 82 हजार 627 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

नवी मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू,मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस बजावून जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे