vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी-जिल्हाधिकारी संतोष पाटील 

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी-जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा प्रतिनिधी- महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार असून कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पाटील बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील अजित पाटील सोनाली मेटकरी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उत्सव कालावधीत पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागांनी घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, महाबळेश्वरला येण्यासाठी वाई, सातारा कोकणातून रस्ते आहेत या रस्त्यांवरील कामे व महाबळेश्वर अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत. त्याचबरोबर महाबळेश्वर शहर सुशोभीकरण करावे. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिद्धी द्यावी. या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी दिले.

ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्या ठिकानाहुन पोहोचण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात यावी. या बस मधून पर्यटकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोच करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्यदृष्टीने आराखडा तयार करावा. महापर्यटन उत्सव महाबळेश्वर काम ज्या संस्थेला दिले आहे त्या संस्थेशी समन्वय साधून विविध विभागांनी उत्सवासंदर्भातील कामे पूर्ण करावी. संस्थेने विविध प्रकारच्या ऐतिहासिक थीमचा वापर करून कार्यक्रमाच्या ठिकाणचे प्रवेशद्वार तयार करावे. सांस्कृतिक कार्यक्रममध्ये स्थानिकांचा सहभाग घ्यावा. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन पॉईंटचे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे. त्याचबरोबर कृषी विभागाने उत्सव काळात तृणधान्य महोत्सवाचे आयोजन ही करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नागराजन म्हणाल्या, उत्सव कालावधीमध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावे. संस्थेने एकाच कार्यक्रमावर लक्ष केंद्रित न करता विविध कार्यक्रम दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे.

पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, उत्सव कालावधीत गर्दी होणार नाही व वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल. घाटातील ज्या ठिकाणी कठडे तुटलेले आहेत, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कटडे दुरुस्त करावेत. वाहन बंद पडल्यास ते हलवण्यासाठी क्रेनची व्यवस्था ही केली जाईल. तसेच उत्सव काळात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत याची माहिती असणारे माहितीपत्र छापावेत व त्यावर क्यूआर कोड चा वापर करावा अशा सूचना उत्सवाचे काम करणाऱ्या संस्थेला केल्या.

0000

संबंधित पोस्ट

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta