vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

              सांगली, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, नवउद्योजक अर्जन सकट, अभिजीत गोंधळे आदि उपस्थित होते.

 या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्जिन मनी योजनेविषयी सविस्तर मार्गदशन करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.     मार्जिन मनी योजनेचे पहिले लाभार्थी नवउद्योजक अर्जन सकट यांनी त्यांचा अनुभव व्यक्त करताना प्रशासननाने बँक प्रशासनास एकत्र घेवून अशा प्रकारे कार्यशाळेचे नियोजन करण्यात यावे असे सुचविले. नवउदयोजक अभिजित गोंधळे यांचा सध्या कडेगाव एमआयडीसी मध्ये कोरोगेटेड बॉक्स चा व्यवसाय सुरू असुन त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसेच प्रशासन व बँक यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

  सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविक केले व सामूहिक उद्देशिका वाचन केले. ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व शहरी भागात लघुनाटिकांचे आयोजन होणार असल्याचे सांगून मागासवर्गीय उद्योजकांनी स्टँड अप योजना, पीएईजीपी, सीएमईजीपी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.     या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, बार्टीचे समतादूत, नागरिक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना-उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका;वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच! वकीलांसाठी इंग्रजाळलेला काळा ड्रेसकोड चालतो, तर मंदिरातील ड्रेसकोडविषयी आक्षेप का ? – ‘रणरागिणी’चा सवाल

vishwatmaklokswamivarta