vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

समाजभान असलेला पत्रकार -दीपक एस मठपती….

 

विशेष प्रतिनिधी -बातमी म्हणजे अंधारलेल्या गोष्टी चा गवगवा असते. अंधाराकडून आधाराकडे जाण्याचे आकलन झाले की पत्रकार हा समाजाचा प्रांजळ प्रिय बनू लागतो. गोष्ट छोटी आणि बोध मोठा अशी बातमी असते. ती लिखाणातून मांडणे म्हणजे शोध आणि बोध अशी दुहेरी मांडणी असते. असाच एक पत्रकार बातमीचा शिलेदार असतो. आज नैतिकता, कर्तव्य भावना आणि सामाजिक भान दीप जपणारे शेकडो पत्रकार ज़िल्हायात कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या बाजूने न बोलणारे जास्त आहेत.दीपक मठपती यांच्या पत्रकारिता वैशिष्ट्ये म्हणजे अखंड प्रामाणिकपणा, नैतिकता, सातत्याने लिखाणातून जनजागृती करणे. पत्रकार समाजाचा आरसा असतो. समाजातील उठणारे प्रतिबिंब लेखणीच्या माध्यमातून लिखाण करणारे,f मठपती हे पत्रकार आहेत. पत्रकारिता हा व्यवसाय नसून सत्यची निष्टा आहे. सजग, चारित्र्य संपन्न अश्या आमच्या स्नेही मित्र दीपक मठपती आहेत. यांचे लेखणी सदा सामाजिक जाणीव सामाजिक प्रश्न, समाजाला दिशा देणारी असावी हिच मनीषा.

 दीपक मठपती सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करताना दिसून येतात. तयामुळे तांना राज्यस्तरीय प्रेरणादायी दीप उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक युवा राज्य परिवर्तर्फे सुद्धा पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना पत्रकरीता युवा पत्रकार पुरस्कार प्राप्त. दीपक मठपती हे निर्भीड पत्रकार, असून लोकांचे प्रश्न मांडणे, पाठपुरावा करतात. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार म्हणजे पोच पावती आहॆ. जनसामान्यांचा आवाज म्हणून पत्रकार कडे पाहिले जाते. पत्रकरीता च्या सोबत ते संवेदनशील लेखक..आहेत. दिपक मठपती पत्रकरिते सोबतच ते संवेदनशील कवी, लेखक सुद्धा आहॆ. कविता ही दैवी शक्ती आहे. असे मला वाटते. कुणीही कविता करू शकत नाही. काळजा पासून,,, संघर्ष तुन भावना प्रकट होतात.असो.दीपक मठपती यांची पत्रकारिता सुरवात सन 2003 या वर्षी पासून कॉलेज प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र माबिंदू लोकमत (युवा मंच )निवड झाली होती. त्यांच्या घरची प्रतिकूल परस्थिती विचार करता, तयांना अनेक वेळा ऍडजस्ट मेन्ट करावे लागलेआणि तरी पत्रकार ची आवड कायम ठेवत दै.आंनद नगरी, दै. उद्याचा मराठवाडा, सा. पोलीस संघर्ष, सा. शिववार्ता, खासदार, समाज साधना आदी प्रिंट मीडिया मधून अनुभव घेतला आहे.आज ते पूर्ण वेळ पत्रकरीता करत आहे. आणि डिजिटल मीडिया कडे वाट चाल करतील.

पत्रकारिता सोबत च ते सामाजिक कार्य सुद्धा करतात.

सामाजिक कार्य —

1)10 वेळारक्त दान स्वतः करून मनुष्याचे जीव वाचवने चे पुण्य कार्य केले आहॆ.खा.रवींद्र चव्हाण यांनी रक्तदान बाबत कौतुक केले आहॆ.

2) मृत्युपश्चात देहदान करून बाबत संमती पत्र श्री गुरु गोविंद सिंघ मेमोरियल हॉस्पिटल नांदेड ज़िल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या माध्यमातून.3) वृक्षारोपण अपारगड पाटणुर येथे सक्रिय सहभाग. 4)गौ सेवा -खडकूत येथे दर रविवार5)लंगर सेवा हुजूर साहेब .. मुख्य गुरुदारा नांदेड 6) माणुसकी भिंत -गरुजुना कपडे वाटप.7)अनाथ आश्रम फळ वाटप, गरजू ब्लॅंकेट (मायची उब )8)बुक बँक अंतर्गत सर्वांना चांगली पुस्तक उपलब्ध करणे 9)येन जी ओ(NGO )ची मदत घेऊन समस्या ग्रस्त, पूरग्रस्त, अडचणी असलेले मदत करणे

भूषवललेली पदे —A)ज़िल्हा समूह संघटक लातूर B)ज़िल्हा कार्याध्यक्ष नांदेड आझाद ग्रुप C)माहिती अधिकार समिती( RTI)समिती ज़िल्हा उपाध्यक्ष नांदेड D)माजी ज़िल्हा प्रसिद्धी प्रमुख व्हॉइस ऑफ मीडिया E)मा. ज़िल्हा उपाध्यक्ष नांदेड पुरोगामी पत्रकार संघ इंडिया

अँड श्याम सुंदर धर्माधिकारी

MA, LLM.DCL.

0000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

अँटॉप हिल परिसरातील अल्पवयीन चार वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस 12 तासात  अटक

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा..

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम